blog-details
  • By Admin

जर्मनी एक आगळी युरोपीय सहल

जर्मनी म्हणल्यावर दुसरे महायुद्ध, सध्याची शैक्षणिक प्रगती, बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज बेंज गाड्या आणि फुटबॉल अशी वेगवेगळी रुपे समोर येतात.जर्मनी हा युरोपातील एक मोठा देश असून तो युरोपीय महा संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे दक्षिणेकडील ब्लॅक फॉरेस्ट पर्वतरांगा तर उत्तरेकडील वालुकामय पठारी प्रदेश असे भौगोलिक वैविध्य जर्मनीत आपल्यास पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या बाबतीत जर्मनी हा युरोपातील सातवा मोठा देश आहे.

जवळजवळ जर्मनीचा 20% भूभाग हा जलस्त्रोतांनी व्यापलेला आहे. बर्लिन ही जर्मनीची राजधानी असून बर्लिनमधील रेल्वे स्थानक हे युरोपातील सर्वात मोठे म्हणजेच चार मजली रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते.

पॅरिस पेक्षा बर्लिन हे नऊ पट मोठे असून वेनिस त्यातुलनेत जास्त पूल हे बर्लिन शहरात आढळतात.

जर्मनी या देशात एकूण 16 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याची घटना वेगवेगळे आहे. जर्मनी ही जगातील दाट लोकसंख्या असलेल्या काही देशांमध्ये गणली जाते. याचे कारण जर्मनी ही युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अमेरिका, चीन, आणि जपान पाठोपाठ जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून जर्मनीचे मोठे नाव आहे.

1990 पासून बर्लिन ही जर्मनीची राजधानी असली तरी भूतकाळात फ्रँकफर्ट, वायमार, न्युनबरग्, बॉन अशा अनेक शहरात जर्मनीची राजधानी होती. जर्मनी मध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत की जे पर्यटनासाठी खूपच नाविन्यता देऊ करतात. जर्मनीमधील काही ठळक पर्यटन स्थळे खालील प्रमाणे आहेत: ब्लॅक फॉरेस्ट रीजन- दाट सूचिपर्णी वृक्षांचा आणि डोंगरांनी दक्षिण जर्मनी मध्ये असलेला हा प्रदेश अतिशय सुंदर असा आहे. कॉन्स्टान्स रिजन : जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया अशा तीन देशांच्या मध्ये असलेला मोठा- कॉन्स्टन्स लेक आणि त्याच्या आसपास असलेल्या भागांना कॉन्स्टन्स लेक-रीजन म्हणून संबोधले जाते.

दक्षिण बायरन् रिजन आणि मयुनिक-अल्पस पर्वतरांगांनी वेढलेला दक्षिण बायरन आणि बायरन राज्याची राजधानी म्यूनीक.खाणीसाठी प्रसिद्ध असलेला "रोहर" रिजन- दुसऱ्या महायुद्धात मध्ये जर्मनी मध्ये असलेले अशा शहरांच्या या भागात रोहर रीजन म्हटले जाते.ब्रांडेनबुर्ग आणि बर्लीन: राजधानी बरलीन आणि आसपास असलेले सुंदर गाव जसे की पोटसडाम!सध्या भारतातून जर्मनी मध्ये जाण्याचे प्रमाण फार वाढले आहे. परदेशी शिक्षण, नवनवीन पुण्या- मुंबईमध्ये असलेल्या जर्मन कंपन्या, जर्मनीमधील यांत्रिक आयात-निर्यात किंवा तेथील प्रदर्शने ह्यामुळे जर्मनीला जायचा योग येतो.

जर्मनीमध्ये पर्यटनासाठी वेगवेगळ्या देशातून लोक येत असतात. तेथील नैसर्गिक वैविधता, पर्यटनासाठी केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना ह्यामुळे आणि जर्मनीमधील खाद्य-संस्कृती जसे की 300 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड किंवा एक हजार प्रकारचे सॉसेजेस किंवा म्युनिक मध्ये होणारा ऑक्टोबर फेस्ट अशा कारणांनी जर्मनीमध्ये जाण्यास लोक प्रवृत्त होतात. वेगवेगळ्या टूर्सचे आयोजन आम्ही करतो.

  • औद्योगिक भेटी
  • एक्झिबिशन सहली,
  • शैक्षणिक सहली आणि
  • स्पेशल जर्मनी सहल
  • जर्मनी सायकल टूर

जर्मनीतील लोक फुटबॉलची शौकीन असून तिथे जगातील सर्वात जास्त फुटबॉल क्लब आहेत जर्मनीत जगातील सर्वाधिक म्हणजे एकंदर चार हजार प्राणिसंग्रहालय आहेत.

जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या तीन देशांच्या मध्ये असलेल्या सुंदर अशा “कॉन्स्टन्स लेक” , आल्पस पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या प्रदेशांमध्ये प्रदेशामध्ये आपण सायकल टूर किंवा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सहली,‌ हायकिंग अशा ऍक्टिव्ह टूर्स जर्मनीमध्ये आयोजित करू शकतो.

त्याचत्या पठडीतील युरोप टूर पेक्षा काही वेगळे युरोप अनुभव करायचे असल्यास आपण आमच्यासोबत जर्मनी टूरला नक्की या!

back top